नवी दिल्ली – भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरला असून इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटींसाठी तो उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटी सामन्यात शमीच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यामुळे शमी उर्वरीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आणि इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर होता. शमी तंदुरुस्त झाला असून सरावाला सुरुवात केली आहे.
शमीने गोलंदाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शमी इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. शमीने बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सरावाला सुरुवात केली आहे.