अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादवसह कृणाल पंड्या व वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांना एकदिवसीय सामन्यांत पदार्पणाची संधी मिळाली आहे.
विराट कोहलीकडे संघाचे कर्णधारपद कायम असून या मालिकेतील सर्व तीनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात वादळी अर्धशतकी खेळी केल्यामुळे त्याला एकदिवसीय संघातही स्थान देण्यात आले आहे. विजय हजारे स्पर्धेत धावांची रास ओतलेल्या मुंबईकर पृथ्वी शॉला मात्र स्थान देण्यात आले नाही. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), लोकेश राहुल (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, महंमद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.