#INDvENG : इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

अखेर सूर्यकुमारची निवड; ईशान किशन आणि राहुल तेवतीया यांनाही संधी

नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी शनिवारी भारताच्या संघाची घोषणा झाली. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला अखेर संधी मिळाली आहे.

आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही सूर्यकुमारची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नव्हती. परंतु, आता त्याचा संघात समावेश करण्यात आला असून ईशान किशन आणि राहुल तेवतीया यांनाही संधी मिळाली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार असून या मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, अहमदाबाद येथे दि. 24 फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्‍सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतीया, नटराजन, भुवनेश्‍वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.