#INDvENG : चौथ्या कसोटीची खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात

आयसीसीची कारवाई टाळण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न

अहमदाबाद : प्रकाशझोतात झालेली तिसरी कसोटी दोन दिवसांत संपल्यामुळे अहमदाबादच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला. त्यामुळे आयसीसीकडून कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी चौथ्या कसोटीसाठी फलंदाजांसाठी नंदनवन ठरणारी खेळपट्टी तयार करण्याची सूचना बीसीसीआयने केली आहे. 

अहमदाबादची तिसरी कसोटी जिंकून भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे लॉर्डसला 18 ते 22 जून या कालावधीत होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्‍यपदाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याकरता भारताला अखेरची कसोटी अनिर्णित राखली तरी पुरेशी ठरणार आहे. या परिस्थितीत फलंदाजांसाठी तसेच फिरकी गोलंदाजीला पूरक ठरेल अशी खेळपट्टी तयार करण्यासाठी बीसीसीआयने क्‍युरेटरला सूचना केल्याचे बोलले जात आहे. 

चौथ्या कसोटीमध्ये फलंदाजांना फायद्याची ठरेल अशी खेळपट्टी तयार करत आयसीसीची कारवाई टाळण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.