#INDvENG : तिसऱ्या एकदिवसीय सामन्याबाबत लवकरच निर्णय

पुणे – भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील 28 मार्च होणारा तिसरा व अखेरचा सामना पुण्याहून मुंबईत स्थलांतरित करण्याबाबत बीसीसीआय येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार आहे.

इंग्लंडच्या संघाला मायदेशी रवाना होण्यास सोपे व्हावे या दृष्टीने हा सामना मुंबई खेळवण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सांगितले.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार असून महाराष्ट्र क्रिकेट संघटना सज्ज झाली आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संपूर्ण मालिकेचं आयोजन पुण्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे. हे सामने 23, 26 आणि 28 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी तीन मुख्य खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सामना स्वतंत्र खेळपट्टीवर खेळवण्यात येईल.

क्रमवारीत अश्‍विनची प्रगती

रवीचंद्रन अश्‍विन याने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या गटात पाचव्या स्थानी उडी घेतली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान नुकत्याच झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अश्‍विनने आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

प्रेक्षकांबाबतचा निर्णय मार्चमध्ये

स्टेडियममध्ये आसन क्षमतेच्या किती टक्‍के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल याबाबतचा निर्णय मार्ड महिन्यातच होणार आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार व निर्णयानंतरच स्टेडियमचे तिकीटदर व त्याची आसनक्षमता त्याविषयीची घोषणा करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.