#INDvENG : पुणेकरांना एकदिवसीय सामन्यांची पर्वणी

दिवस-रात्र सामना अहमदाबादेत, तर एकदिवसीय मालिका पुण्यात

चार कसोटी, पाच टी-20 व तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 

मुंबई – इंग्लंडचा संघ फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या मालिकेत 4 कसोटी, 5 टी-20 तर 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने पुण्यात होणार असल्याने पुणेकरांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशी परतल्यावर लगेचच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. करोनाचा धोका कायम असल्यामुळे केवळ कसोटी सामन्यांसाठीच चार केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. टी-20 मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमध्ये होणार असून एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने पुण्यात होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रदीर्घ मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्धही प्रदीर्घ मालिका खेळणार आहे. गेल्या मार्च महिन्यापासून भारतासह जगभरात करोनाचा धोका निर्माण झाल्यामुळे क्रिकेट ठप्प झाले होते. त्यानंतर अमिरातीत आयपीएल स्पर्धा पार पडली. त्यानंतर लगेचच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. आता भारतीय संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धची मालिका खेळायची आहे. बीसीसीआय व इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.

मालिकेचे वेळापत्रक 

कसोटी 

5 ते 9 फेब्रुवारी -पहिला कसोटी सामना, चेन्नई
13 ते 17 फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना, चेन्नई
24 ते 28 फेब्रुवारी – तिसरा कसोटी सामना, अहमदाबाद (दिवस-रात्र)
4 ते 8 मार्च – चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

टी-20

12 मार्च  – पहिला टी-20 सामना
14 मार्च – दुसरा टी-20 सामना
16 मार्च – तिसरा टी-20 सामना
18 मार्च – चौथा टी-20 सामना
20 मार्च पाचवा टी-20 सामना
(सर्व सामने अहमदाबादेत)

एकदिवसीय सामना 

23 मार्च – पहिला एकदिवसीय सामना
26 मार्च  – दुसरा एकदिवसीय सामना
28 मार्च – तिसरा एकदिवसीय सामना
(सर्व सामने पुण्यात)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.