#INDvENG 2nd ODI : इंग्लंडने टॉस जिंकला

पुणे –फलंदाजी व गोलंदाजीत सरस कामगिरी करत पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवलेल्या भारतीय संघाला आज होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह मालिका विजय खुणावत आहे. कसोटी तसेच टी-20 मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकत इंग्लंडला व्हाइटवॉश देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज त्याच इराद्याने मैदानात उतरेल.

सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टॉस)
कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. ( England win the toss and elect to field )
कर्णधार जोस बटलर याने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान, एकदिवसीय मालिकेत तीन सामने होणार असले तरीही आज होत असलेल्या सामन्याद्वारे मालिका खिशात टाकण्याची कोहलीच्या संघाला नामी संधी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.