#INDvAUS : ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या वनडे साठी ‘असा’ आहे भारतीय संघ

मुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत वानखेडे स्टेडियम सुरू झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरन फिंच याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

कर्णधार कोहलीने ११ सदस्यीय संघात सलामीवीर म्हणून शिखर धवन आणि के एल राहुल यांचा समावेश केला आहे, तर मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह या वेगवान गेलंदाजाना संधी दिली आहे. तर नवदीप सैनी, शिवम दुबे , चहल यांना संघात स्थान मिळालेलं नाही.

भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शारदुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरन फिंच याने तडफदार फलंदाज मार्नस लबूशेन याचा संघात समावेश केला आहे. त्याने कसोटीत धावांचा रतीबच लावला आहे, तो आजच्या वन-डे सामन्यात कशी फलंदाजी करणार हे बघणे महत्वपूर्ण ठरणार आहे. वेगवान गोलंदाज म्हणून पैट कमिंस, मिचेल स्टाॅर्क आणि रिचर्डसन यांचा समावेश केला आहे.

ऑस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, एरॉन फ‍िंच (कर्णधार), स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ऐश्टन टर्नर, एलेक्स कैरी, एश्टन एगर, पैट कमिंस, मिचेल स्टॉर्क, केन रिचर्डसन आणि एडम जाम्‍पा.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया एकूण १३७ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने ५० तर आॅस्ट्रेलियाने ७७ विजय मिळवले आहेत. १० सामने अनिर्णित राहिले आहेत. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिले २ सामने गमावल्यानंतरही उर्वरित ३ सामने जिंकून ३-२ असे पराभूत केले होते. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी कोहली आणि कंपनी सज्ज असून भारतीय संघ यात बाजी मारणार का ?, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.