सिडनी : भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यानच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला १४ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया संघ भारत दौ-यावर येणार आहे. मात्र आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी विश्रांती घेतली असून, ते भारत दौ-यावर येणार नाहीत.
Australia coach Justin Langer takes break, Andrew McDonald to lead side in three-match ODI series against India. #INDvsAUS
— Press Trust of India (@PTI_News) January 7, 2020
जस्टीन लँगर यांच्या जागी वरिष्ठ सहायक अॅण्ड्रयू मॅकडोनाल्ड हे संघाला भारत दौ-यात मार्गदर्शन करतील. ३८ वर्षीय मॅकडोनाल्ड पहिल्यांदा आॅस्ट्रेलिया संघाची जबाबदारी संभाळतील.
दरम्यान, नुकतीच आॅस्ट्रेलियात पार पडलेली न्यूझीलंड विरूध्दची तीन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका आॅस्ट्रेलियाने ३-० ने जिंकली आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलिया भारत दौ-यावर येत आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ जानेवारीला मुंबईत, दुसरा सामना १७ जानेवारीला राजकोटमध्ये आणि तिसरा सामना १९ जानेवारीला बेंगळूरूमध्ये होईल.