#INDvAUS : भारताचे ऑस्ट्रोलियसमोर २५६ धावांचे आव्हान

मुंबई : सलामीवीर शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रोलियसमोर विजयासाठी २५६ धावांचे आव्हान ठेवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २५५ धावांपर्यत मजल मारली आहे.

ऑस्ट्रोलियाचा कर्णधार अॅरन फिंच याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही.

संघाची धावसंख्या १३ असताना स्टार्कने डेविड वाॅर्नरकरवी रोहित शर्माला १० धावांवर झेलबाद केले. त्यानंतर लोकेश राहूल आणि शिखर धवन याने डाव दुस-या विकेटसाठी १२१ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या १३४ पर्यंत नेली.

राहुल ४७ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकांत शिखर धवनला पैट कमिन्सने एगरकरवी झेलबाद करत भारतीय संघास १४० धावसंख्येवर तिसरा धक्का दिला. धवनने ९१ चेंडूत ९ चौकार व १ षटकारासह सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली.

त्यानंतर फलंदाजीस आलेला संघाचा कर्णधार विराट कोहली मोठी खेळी करेल अस वाटलं होतं, पण एडम जम्पाने त्याला १६ धावांवर बाद करत माघारी धाडलं. नवोदित युवा खेळाडू श्रेयस अय्यर ही अवघ्या ४ धावांवर बाद झाला, त्यावेळी भारताची ३२.५ षटकांत ५ बाद १६४ अशी स्थिती झाली होती.

त्यानंतर शेवटचे पाच फलंदाज अवघ्या ९१ धावांवर माघारी परतले. यामध्ये रिषभ पंत २८, रविंद्र जडेजा २५, शार्दुल ठाकूर १३, मोहम्मद शमी १०, कुलदीप यादव १७ धावांवर बाद झाले आणि भारताचा डाव ४९.१ षटकांत २५५ वर संपुष्टात आला.

ऑस्ट्रोलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्कने १० षटकात ५६ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. पैट कमिन्स आणि केन रिचर्डसनने प्रत्येकी २ तर एडम जम्पा आणि एश्टन एगरने प्रत्येकी १ गडी बाद केला.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)