#INDvAUS : भारताविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

पाच नवोदित खेळाडूंना संधी

मेलबर्न : – भारताविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी संघाची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने बुधवारी दोन सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया अ आणि चार कसोटीसाठी 17 सदस्यीय राष्ट्रीय संघाची घोषणा केली.

निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान दिले असून यामध्ये  कॅमरुन ग्रिन, विल पुकोव्सकी, फिरकीपटू मिचेल स्वेप्सन, वेगवान गोलंदाज सिन अबॉट आणि अष्टपैलू मायकल नेसर यांना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. या सर्व खेळाडूंनी  घरगुती क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं आणि त्याचंच बक्षीस त्यांना मिळालं असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने म्हटले आहे. तर अपेक्षेप्रमाणे टीम पेनकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय, 3 टी-20 तसेच 4 कसोटी सामन्यांची खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल त्यानंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका होईल. तर कसोटी मालिकेस 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना हा दिवस-रात्र स्वरूपाचा असेल. ही कसोटी मालिका आयसीसीच्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचाच भाग आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया कसोटी संघ –

टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), सिन अबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रिन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लॉयन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्य वेड, डेव्हिड वॉर्नर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा कार्यक्रम –

पहिला कसोटी सामना – 17 ते 21 डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – 26 ते 30 डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – 7 ते 11 जानेवारी 2021 – सिडनी
चौथा कसोटी सामना – 15 ते 19 जानेवारी – गॅबा

ऑस्ट्रेलिया अ संघ –  

सिन अबॉट, एश्टन एगर, जो बर्न्स, जैक्सन बर्ड, एलेक्स केरी (यष्टीरक्षक), हैरी कॉनवे, कॅमरुन ग्रिन, मार्कस हैरिस,ट्रॅविस हेड, मोइसेस हेनरिक्स, निक मैडिसन, मिशेल मार्श , मायकल नेसर , टीम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, मार्क स्टेकेटी, विल सदरलैंड, मिचेल स्वेप्सन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.