#INDvAUS : आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला

मुंबई : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गेल्या वर्षापासून कायम असलेले विजयी सातत्य याही वर्षी राखण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारतीय संघाचा आॅस्ट्रेलियाशी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होत आहे.

खेळपट्टी जरी फलंदाजीसाठी अनुकूल असली तरी सांयकाळी पडणारे दव दुस-या डावात गोलंदाजी करणा-या संघासाठी त्रासदायक ठरू शकते त्यामुळे नाणेफेक निर्णायक ठरणार आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात सामन्यास सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा आॅस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. कर्णधार अॅरन फिंच याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले आहे.

दरम्यान, भारत-आॅस्ट्रेलिया एकूण १३७ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने ५० तर आॅस्ट्रेलियाने ७७ विजय मिळवले आहेत. १० सामने अनिर्णित राहिले आहेत. गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियाने भारतीय संघाला ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिले २ सामने गमावल्यानंतरही उर्वरित ३ सामने जिंकून ३-२ असे पराभूत केले होते. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी कोहली आणि कंपनी सज्ज असून भारतीय संघ यात बाजी मारणार का ?, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.