हैदराबाद – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असून आज जो संघ जिंकेल तो मालिकेवर कब्जा करेल. पहिला टी-20 ऑस्ट्रेलियाने तर दुसरा टी-20 भारताने जिंकला. भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have elected to bowl against Australia in the third #INDvAUS T20I.
Follow the match ▶️ https://t.co/xVrzo737YV pic.twitter.com/QkinggmHiU
— BCCI (@BCCI) September 25, 2022
रोहितने प्लेइंग-11 (Playing11) मध्ये बदल केला आहे. ऋषभ पंतला वगळण्यात आले असून भुवनेश्वर कुमारला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचनेही प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. शॉन अॅबॉटच्या जागी जोश इंग्लिस संघात परतला.
दोन्ही संघाची प्लेइंग-11
भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.
🚨 Team News 🚨
1️⃣ change for #TeamIndia as @BhuviOfficial is named in the team.
Deepak Hooda wasn’t available for selection for the third #INDvAUS T20I owing to a back injury.
Follow the match ▶️ https://t.co/xVrzo737YV
A look at our Playing XI 🔽 pic.twitter.com/3fbgGjK3vu
— BCCI (@BCCI) September 25, 2022
ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दरम्यान, 2013 पासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला घरच्या टी-20 मालिकेत पराभूत करू शकला नव्हता. 2007 आणि 2013 मध्ये त्यांनी प्रत्येकी एक सामन्याची मालिका जिंकली. यावेळी संघाने मालिका जिंकल्यास नऊ वर्षांत प्रथमच कांगारूंना घरच्या मैदानावर पराभूत करणे शक्य होईल. 2017-18 मध्ये ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली आणि 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली.