नवी दिल्ली – रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विनसमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने लोटांगण घातले. या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. या दोघांच्या गोलंदाजीचा पहिल्या कसोटी सामन्यापासून ऑस्ट्रेलियाने इतका धसका गेतला आहे की या कसोटीतही त्यांची दुसऱ्या डावात त्रेधातिरपीट उडाली. पहिल्या डावात 263 धावा करत चांगली सुरुवात केल्यावरही त्यांचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर संपला व विजयासाठी आवश्यक धावा भारताने 4 गडी गमावून पूर्ण करत या मालिकेत 2-0 अशी सुरक्षित आघाडी घेतली.
2️⃣-0️⃣ ✅@cheteshwar1 with the winning runs as #TeamIndia register a 6️⃣-wicket win in Delhi 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/1wrCKXPASU
— BCCI (@BCCI) February 19, 2023
या कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 263 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना भारताचा पहिला डाव 262 धावांवर संपला होता व ऑस्ट्रेलियाने 1 धावेची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसरा दिवस संपला तेव्हा त्यांनी आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 61 अशी भक्कम मजल मारत 62 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर रविवारी त्यांनी डाव पुढे सुरू केला व जडेजा आणि अश्विनच्या फिरकी गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा नांगी टाकली.
त्यांचा दुसरा डाव 113 धावांवर संपला. त्यांच्याकडून ट्रॅव्हीस हेडने 43 तर, मार्नस लेबुशेनने 35 धावा केल्या. त्यानंतर मात्र जडेजा-अश्विनसमोर त्यांच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. त्यानंतर त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. 4 बाद 95 अशी स्थिती असताना काही क्षणातच त्यांची अवस्था 7 बाद 95 अशी बनली व भारतीय संघाला विजय खुणावू लागला. अखेर त्यांचा दुसरा डाव 113 धावांवर संपला व विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करत भारताने सोपा विजय प्राप्त केला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ranji-trophy-2023-saurashtra-become-champions-again-beat-bengal-in-final/
भारतीय संघाने दुसरा डाव सुरू केल्यावर सलामीवीर लोकेश राहुलने पुन्हा एकदा निराशा केली. तो एक धाव काढून बाद झाला. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा भरात होता. त्याला साथ देताना चेतेश्वर पुजाराने संयमी फलंदाजी केली. रोहित स्थिरावलेला असताना अनावश्यक धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याने 20 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 31 धावांची खेळी केली.
लक्षवेधी
– कोहलीच्या 25 हजार आंतरराष्ट्रीय धावा
– सर्वात जलद हा टप्पा केला पार
– जगातील सहावा फलंदाज
– भारताचा दुसराच फलंदाज
– सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी
– पुजारा व भरतची भक्कम भागीदारी
– जडेजाचे संपूर्ण सामन्यात 10 बळी
– सलग दुसऱ्या कसोटीत सामन्याचा मानकरी
– अश्विनचे संपूर्ण सामन्यात 6 बळी
– 20 पैकी 16 बळी फिरकी गोलंदाजांचे
– चार सामन्यांच्या मालिकेत 2-0 सुरक्षित आघाडी
यावेळी खेळपट्टीवर आलेल्या विराट कोहलीने सुरुवात थाटात केली, मात्र तोदेखील 31 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावांवर परतला. श्रेयस अय्यरही 11 धावांवर बाद झाला. अखेर पुजाराला यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतने सुरेख साथ देत संघाचा विजय साकार केला. पुजाराने नाबाद 31 धावा करताना 74 चेंडूत 4 चौकार फटकावले. भरतने नाबाद 23 धावांची खेळी करताना 22 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावला. ऑस्ट्रेलियाकडून नाथन लॉयनने 2 तर टॉड मर्फीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 263. भारत पहिला डाव – 262. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 31.1 षटकांत सर्वबाद 113 धावा. (ट्रॅव्हीस हेड 43, मार्नस लेबुशेन 35, रवींद्र जडेजा 7-42, रविचंद्रन अश्विन 3-59). भारत दुसरा डाव – 26.4 षटकांत 4 बाद 118 धावा. (रोहित शर्मा 31, विराट कोहली 20, चेतेश्वर पुजारा नाबाद 31, श्रीकर भरत नाबाद 23, नाथन लॉयन 2-49, टॉड मर्फी 1-22).