#IndvAus 2nd T20 : ऑस्ट्रेलियासमोर भारताचे 191 धावांचे आव्हान

बेंगलुरू – भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या तडाकेबाज अर्धशतकीच्या खेळावर भारताने दुसऱ्या आणि अखेरच्या टी20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 191 धावांचे आव्हान ठेवले आहे. विराट कोहलीने 38 चेंडूत (6 षटकार, 2 चौकार) नाबाद 72 धावा केल्या. विराटने आजच्या सामन्यात 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टी20 क्रिकेटमधील विराटचे हे 20 वे अर्धशतक ठरले.

सलामीवीर लोकेश राहुलने 26 चेंडूत 47 धावा केल्या. तर यष्टीरक्षक एम.एस.धोनीने 23 चेंडूत (3 षटकार आणि 3 चौकार) 40 धावा केल्या. शिखर धवन 14 आणि ऋषभ पंत 1 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, जेसन बेहरनडोर्फ, नाथन कुल्टर आणि डार्सी शाॅर्ट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here