पिंपरी | उद्योगांनी देशाला कौशल्याची राजधानी बनविण्यात सहभाग द्यावा – पी एन जुमले

हिंजवडी – पुणे : भारत सरकारच्या अप्रेंटिसशिप प्रमोशनच्या विविध योजना आहेत. युवकांना उद्योगांनी एनएटीएस अप्रेंटिसच्या योजनंद्वारे ऑन जॉब ट्रेनिंग दिल्यास प्रत्येक युवकामागे दरमहा रू ४५०० हजार प्रमाणे रू ५४००० इतका वार्षिक सहभाग केंद्र शासन देते.
यामुळे उद्योगांचा पगारावर होणारा खर्च अंदाजे २५-३० टक्क्यांनी कमी होऊन, युवकांनी नोकरी मध्येच सोडण्याचे प्रमाण देखील घटते.
सेवा, व्यापार, उद्योग क्षेत्रातील आस्थापनांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभागाचे संचालक पी एन जुमले यांनी बीव्हीजी इंडिया लिमिटेडने आयोजित केलेल्या इंडस्ट्री एचआर मीटच्या उद्घाटनप्रसंगी केले.
याप्रसंगी बीव्हीजी इंडिया लिमिटेड चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, कॉर्पोरेट अफेयर्स विभागाच्या प्रमुख वैशाली गायकवाड व अप्रेंटिस विभाग प्रमुख रवी घाटे उपस्थित होते.
या इंडस्ट्री एचआर मीटमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड भागातील ८० पेक्षा जास्त उद्योगांनी सहभाग घेतला होता. केंद्र शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या नॅट्स 2.0 या योजनेविषयी या उद्योगांना अवगत करण्यात आले.
बोर्ड ऑफ अप्रेंटीशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन एन वडोदे यांनी या नवीन योजनेविषयी इत्यंभूत माहिती दिली.
हणमंतराव गायकवाड यांनी भारत सरकारच्या कौशल्य विकास विभागासोबत बीव्हीजी इंडियाचा झालेला करार व त्याद्वारे मराठी युवकांना जगभरात उपलब्ध होऊ घातलेल्या संधी सर्व उद्योगासमोर मांडल्या व त्यांना या योजनेत सहभागी होण्याविषयी आवाहन केले.
याप्रसंगी अप्रेंटिसच्या योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या विविध उद्योगांना गौरविण्यात आले यामध्ये सुजन काँटिटेक हनुमंत खेंगरे, प्रभा इंजिनिअरिंग – अविनाश आडमुठे, जगदीश इलेक्ट्रॉनिक्स – राहुल मुळे , रेनाटा प्रिसिजन- महेश जाधव व संपदा संस्था यांचा समावेश होता.
अप्रेंटीशीपचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल, सर्वोत्तम पुरस्काराने पराग पवार यांना तसेच चंद्रकांत निंबाळकर, विनोद जाधव, वैभव भोसले, सचिन हरपळे, निशि कांत नीलकमल आंचन व निलेश निर्वाण यांना तसेच बीव्हीजीच्या वतीने सर्वोत्तम प्रचारक कर्मचारी म्हणून प्रमोद पवार यांना देखील गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन बीव्हीजी अप्रेंटिसशिप विभागाच्या वतीने विनोद धोमे, प्रमोद पवार, मंदार केळकर, अतुल मस्के व रोहिणी जगताप यांनी केले.





