हडपसर – येथील समाजिक कार्यकर्ते अतुल नारायण तरवडे यांच्या वतीने गुरुवारी ( दि. २८ ) २०२१ रोजी ह.भ.प श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरवडे वस्ती, महंमदवाडी येथे सायंकाळी ८ ते १० यावेळेत ,सामाजिक कार्यकर्ते अतुल तरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोविड-१९ च्या प्रभावाने मानवी जीवन विस्कळीत झालेले आहे. कोरोनाच्या परिस्थितीला
कशा प्रकारे सामोरे जावे, कोरोना काळात सामाजिक बांधिलकी कश्या प्रकारे जोपासावी या वैफल्यग्रस्त काळात आपल्या जीवनाचा ‘पुनश्च हरिओम’ कशा प्रकारे करता येईल यासाठी ह.भ.प इंदुरीकर महाराज यांचे अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधनपर कीर्तनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
अशी माहिती आयोजक अतुल तरवडे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हे कीर्तन होत आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अतुल तरवडे यांनी केले आहे.