मुंबई – शीना बोरा हत्या प्रकरणात अटकेत असलेली इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने आज पुन्हा फेटाळून लावला. ती सध्या भायखळ्याच्या महिला कारागृहात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आपली कारागृहातून तात्पुरती सुटका करावी, अशी मागणी करीत तिने हा जामीन अर्ज केला होता. पण कोर्टाने ते अमान्य केला.
आपल्याला आधीच अनेक विकार असल्याने कारागृहात आपल्याला करोना होण्याचा धोका असल्याने आपल्याला 45 दिवसांसाठी तात्पुरता जामीन देण्यात यावा असे तिने कोर्टाला विनवले होते. ऑगस्ट 2015 पासून ती कारागृहात आहे.
शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी हिचा पती माध्यम सम्राट पीटर मुखर्जी यालाहीं अटक झाली होती पण मुंबई उच्च न्यायालयाने या वर्षाच्या सुरूवातीला त्याची जामीनवर सुटका केली आहे.