आळंदी – चऱ्होली खुर्द गाव हद्दीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत सापडल्याची माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. ए. चव्हाण यांनी दिली. याबाबत ज्ञानेश्वर बाळासाहेब जगदाळे यांनी खबर दिली.
मृत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे- रंग गोरा, उंची 160 सेंटीमीटर, बांधा मध्यम, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, पायात पैंजण, जोडवे, अंगात पांढरट बदामी रंगाचा टॉप व केशरी रंगाचा सलवार. या वर्णनाच्या महिलेबाबत कोणाला माहित असल्यास त्यांनी आळंदी देवाची पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.