अहमदनगर: पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या विधानावरुन इंदोरीकर महाराज चांगलेच अडचणीत सापडले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, इंदोरीकरांना येत्या 7 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाने संगमनेर कोर्टात पीसीपीएनडीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केलाय. 26 जून रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना 7 ऑगस्ट रोजी न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
इंदोरीकर महाराजांना आता स्वत: हजर होत वकीलांमार्फत आपली बाजू मांडावी लागणार आहे.
एका कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते तसेच टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते, असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केले होते. त्यांच्या किर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
इंदुरीकर महारांजावर या वक्तव्यामुळे पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस देखील काढली होती.