चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : वाहने चोरणारी टोळी असल्याचा पोलिसांचा कयास
नागरिकांनी सतर्क राहावे
इंदोरी परिसरातील वाढत्या चोरीच्या घटना पाहता तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या वतीने परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवून पोलिसांना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
इंदोरी – इंदोरी-माळवाडी परिसरात गेल्या आठवड्यात वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले दिसते. ग्रामस्थ महागडी वाहने चोरीला जातील का ? या भीतीने त्रस्त झाले आहेत.
शनिवारी (दि. 1) प्रथम चोरी माळवाडी येथील आपुलकी हॉटेलचे मालक सुनील दाभाडे यांच्या राहत्या घरापासून पांढऱ्या रंगाची मोटार चोरीला गेली. पहाटे चार वाजता चोरीला गेली. त्यानंतर दोन जून इंदोरी गावचे माजी उपसरपंच प्रशांत भागवत यांची इनोव्हा मोटार पहाटे राहत्या घरापासून चोरी गेली.
विशेष म्हणजे सुनील दाभाडे आणि प्रशांत भागवत यांच्या महागड्या किंमतीची वाहने तळेगाव-चाकण रस्त्यालगत होत्या. हा रस्ता सतत वर्दळीचा आहे. चोर हे वाहने सुरू करुन घेऊन गेले आहेत. यामध्ये इंदोरी येथील प्रशांत भागवत यांची इनोव्हा चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये तीन व्यक्ती चेहऱ्याला काळ्या रंगाचा रूमाल, स्कार्प बांधून चोरी करीत असलेले दिसून येत आहे.
त्यांच्याकडे पिंपरी येथून चोरी करुण आणलेली अजून एक इनोव्हा होती. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दुसऱ्या दिवशी इंदोरी येथील इंद्रायणीनगर येथून एक दुचाकी (दि. 3) रात्री राहत्या घरापासून चोरीला गेली. चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, सलग एका पाठोपाठ होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.
इंदोरी-माळवाडी परिसरात दोन चारचाकी वाहने आणि एका दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये माळवाडी येथून स्कार्पिओ, तर इंदोरीतून इनोव्हा मोटार आणि एक दुचाकी अशी तीन वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. तरी परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे शक्यता वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावे. वाहने सुरू झाल्याचा आवाज आल्यावर कोण वाहने चालवतोय याची खात्री करावी; परिसरात काही चुकीचे घडताना निदर्शनास असल्याचे निदर्शनास आल्यास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे संपर्क साधावा.
– एम एल मदेवाड, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे.