पी.व्ही सिंधूला पराभवाचा झटका; विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले

संग्रहित छायाचित्र...

इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धा : जपानच्या यामागुचीकडून पराभव

जकार्ता – भारताच्या पी.व्ही. सिंधूचे इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न रविवारी भंगले. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून 15-21, 16-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.

यामागुची आणि सिंधू यांच्यात यापूर्वी झालेल्या 14 सामन्यात सिंधूकडे 10-4 अशी मजबूत आघाडी होती. त्यामुळे इंडोनेशिया ओपनमध्ये सिंधूचे पारडे जड होते. मात्र, कोर्टवरील सामन्यावेळीच्या कामगिरीत इतिहास बदलण्याची ताकद असल्याचे दाखवून देत यामागुचीने सिंधूविरुद्ध पाचव्या विजयाची नोंद केली. सिंधूने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत यामागुचीसमोर आव्हान निर्माण करण्यास सुरुवात केली. मात्र, यामागुचीने आघाडीवर असलेल्या सिंधूला अप्रतिम स्मॅशच्या माऱ्याने हतबल ठरवले. सिंधूच्या काही चुका यामागुचीच्या विजयात भर घातली.

तत्पूर्वी ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिने शनिवारी ऑल इंग्लंड चॅम्पियन चेन युफेई हिच्यावर सरळ गेममध्ये मात करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चेनवर सिंधूने 21-19, 21-10 अशा फरकाने विजय नोंदविला. ऑस्ट्रेलियन, स्विस आणि ऑल इंग्लंड ओपन जिंकणारी चेन यंदाच्या मोसमात दमदार खेळ करीत होती. सिंधूने मात्र तिला संधीच दिली नव्हती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)