जकार्ता : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिच्या या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
स्पर्धेतील महिला एकेरीच्या दुस-या फेरीत जपानच्या सायका ताकाहाशी हिने सिंधूचा १६-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव करत पुढील फेरीत आगेकूच केली आहे. जागतिक क्रमवारीत सिंधू चौथ्या तर सायका १४ व्या स्थानावर आहे. याआधी दोघी ६ वेळा आमनेसामने आल्या होत्या. यामध्ये ४ सामने सिंधूने तर २ सामने सायाकाने जिंकल्या होत्या, त्यामुळे सिंधूचे पारडे जड मानले जात होते पण अखेर सायाकाने या सामन्यात बाजी मारत विजय मिळवला.
Sayaka Takahashi beat Pusarla V Sindhu 16-21 21-16 21-19 to enter the quarterfinals of the Daihatsu Indonesia Masters. #HSBCBWFbadminton #IndonesiaMasters2020 #HSBCRaceToGuangzhou #WorldTour @badmintonphoto pic.twitter.com/Rs31K2A6Df
— BWF (@bwfmedia) January 16, 2020
दरम्यान, सलामीच्या लढतीत पाचव्या मानांकित पी.व्ही. सिंधूने जपानच्या अया ओहोरीचा १४-२१, २१-१५, २१-११ असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे सायना नेहवाल हिला मात्र पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता.