जकार्ता : भारताच्या पी.व्ही. सिंधूने इंडोनोशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच केली आहे तर सायना नेहवाल हिला मात्र पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला आहे.
World champion P V Sindhu advances to second round of Indonesia Master with win over Japan's Aya Ohori.
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2020
महिलाच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत पाचव्या मानांकित पी.व्ही. सिंधूने जपानच्या अया ओहोरीचा १४-२१, २१-१५, २१-११ असा पराभव केला. यापूर्वी सिंधूला जपानच्या ओहोरीकडून १० सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
Defending champion Saina Nehwal, B Sai Praneeth make first-round exits. #IndonesiaMasters #SainaNehwal #BWF
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2020
दुसरीकडे जपानच्याच सायाका ताकाशाहीने गतविजेत्या सायना नेहवालचा १९-२१, २१-१३, २१-५ असा पराभव केला. त्यामुळे सायना नेहवालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.