बाली – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू व दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने शुक्रवारी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सिंधूने या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सीम युजीनचा अत्यंत चुरशीच्या लढतीत 14-21. 21-19 व 21-14 असा पराभव केला. पहिली गेम सिंधूने गमावली होती मात्र, त्यानंतरच्या दोन्ही गेममध्ये सिंधूने आपला खेळ उंचावला व युजीनीच्या चुकांचा पुरेपूर लाभ घेत हा सामना तब्बल एक तास 6 मिनिटांच्या जीगरबाज खेळीच्या जोरावर जिंकला.
उपांत्य फेरीत सिंधूची लढत जपानच्या असुका ताकाहाशी व थायलंडच्या रॅश्नोक इंटानोन यांच्यातील विजेतीशी होणार आहे.