Accident News : मोठा अपघात..! बस इंधन टँकरच्या धडकेत १६ जणांचा मृत्यू, अपघातानंतर उडाला भडका
Accident News : डोनेशियातील सुमात्रा येथे बस आणि डिझेल टँकरच्या धडकेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Accident News : इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर बुधवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी बस आणि इंधन टँकर यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर ही दुर्घटना घडली. उत्तर मुसी रावास परिसरात हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Accident News)
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये बसमधील १४ प्रवासी आणि टँकरमधील दोन जणांचा समावेश आहे. अपघातानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागली, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचे सांगितले जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. (Accident News)
प्राथमिक माहितीनुसार, बसच्या टायरचा स्फोट झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट इंधन टँकरवर आदळली. या धडकेनंतर मोठा स्फोट होऊन आगीने दोन्ही वाहने वेढली. संबंधित टँकरमध्ये डिझेल इंधन भरलेले होते. (Accident News)
दरम्यान, इंडोनेशियात वाहतूक अपघातांची संख्या तुलनेने जास्त आहे. खराब रस्ते, जुनाट वाहने आणि अपुरी देखभाल ही त्यामागची प्रमुख कारणे मानली जातात. गेल्या महिन्यातही वेस्ट जावा येथे एका रेल्वे अपघातात १६ महिलांचा मृत्यू झाला होता, तर त्यानंतर काही दिवसांतच सेंट्रल जावा येथे ट्रेन-कार धडकेत चार जणांचा मृत्यू झाला होता. (Accident News)





