दोन आठवड्यांपासून भारत-पाकमधील तणाव घटला

ट्रम्प यांनी पुन्हा दिला मध्यस्थीचा प्रस्ताव

वॉशिंग्टन- भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्‍मीरच्या मुद्दयावरून निर्माण झालेला तणाव दोन आठवड्यांपूर्वी जेवढ्या प्रमाणात होता, त्याच्या तुलनेत आता बराच कमी झाला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानची तयारी असल्यास द्विपक्षीय तणावामध्ये मध्यस्थी करण्याची आपली तयारी असल्याचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

26 ऑगस्टला फ्रान्समध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी हे प्रतिपादन केले आहे. काश्‍मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि या मुद्दयांवर त्रयस्था मध्यस्थीचा प्रस्ताव फ्रान्समधील बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी फेटाळला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका भेटीदरम्यान ट्रम्प यांनी सर्वप्रथम मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता.

भारत-पाकिस्तानदरम्यानचा तणाव दोन आठवड्यांपूर्वी होता, त्यापेक्षा कमी झाला आहे, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)