India-China News | भारत आणि चीन यांच्यात २०२० पासून सुरु असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला आहे. दोन्ही देशांनी केलेल्या करारानुमसार वादग्रस्त भागातून सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे देप्सांग पठार आणि देम्योक या ठिकाणी २०२० पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार आहे. या निर्णयामुळे भारत–चीन सीमेवरील तणाव निवळला असल्याचे मानले जात आहे. त्यानंतर दिवाळीनिमित्त दोन्ही देशांचे सैनिक आज गुरुवारी परस्परांना मिठाई देणार आहेत.
सैन्य मागे घेण्याची पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांनी काही बाबींची पडताळणी सुरू केली आहे. आजपासून भारतीय लष्कर गस्त घालणार आहे. पूर्व लडाखमधील LAC वर गस्त घालण्यासाठी आणि सैन्याची सुटका करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराला चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला विरोध संपवण्यात हे मिळालेले मोठे यश आहे.
अंमलबजावणी सुरू
दरम्यान, भारत, चीनच्या लष्करांमध्ये गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये संघर्ष झाला होता. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी २१ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, भारत व चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सैन्य मागे घेण्याबाबत करार करण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून चर्चा सुरू होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तसा करार झाला. आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे. India-China News |
भारत आणि चीनचे ग्राऊंड कमांडर देपसांगमध्ये दोन आणि डेमचोकमध्ये एका ठिकाणी भेटले. तसेच दोन्ही बाजूंनी डिसएंगेजमेंटची पडताळणी करण्यात आली. डेमचोक आणि देपसांग येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या चौक्या आणि तंबू हटवण्यात आल्यानंतर दोन्हीकडचे सैनिक एप्रिल २०२० पूर्वीच्या स्थितीत गेले आहेत. India-China News |
दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना मिठाई देणार
आता आज दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना मिठाई देतील. भारत आणि चीनमध्ये असलेल्या ६ बॉर्डर पर्सनल मिटिंग पॉईंटवर ही मिठाईची देवाण घेवाण होणार आहे. मात्र खबरदारी म्हणून भारतीय लष्कर चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले की, ‘माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदर्शानुसार चीनसोबतची शांतता प्रक्रिया पुढे चालू ठेवायची आहे. वाजपेयी म्हणाले होते की, आम्ही मित्र बदलू शकतो, पण आम्हाला आमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत आणि हे भारताचे स्पष्ट धोरण आहे.’
दरम्यान, भारत आणि चीन सैन्यामध्ये मे २०२० पासून सीमेवर तणाव आहे. गलवान खोऱ्यात सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी २० जवान शहीद झाले होते. तर अनेक चिनी सैनिकही मारले गेले होते.
हेही वाचा: