प्रवाशाला अचानक सुरू झाला त्रास; इंडिगो विमानाचं पाकिस्तानात इर्मजन्सी लॅंडिंग

नवी दिल्ली – शारजाहून लखनौकडे निघालेले इंडिगो विमान कंपनीचे विमान आज मेडिकल इर्मजन्सीमुळे पाकिस्तानातील कराचीत उतरवावे लागले. या विमानातील एका प्रवाशाला अचानक त्रास सुरू झाला.

त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी हे विमान कराचीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे विमान कराचीत उतरवले गेले पण तरीही हा प्रवासी वाचू शकला नाहीं. विमान उतरताच डॉक्‍टरांनी या रूग्णाची वैद्यकीय तपासणी केली असता तो मृत झाल्याचे आढळून आले.

या प्रवाशाचे नाव किंवा अन्य तपशील मात्र लगेच समजू शकला नाही. विमान कंपनीने या रूग्णाला श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांच्या कुटुंबियांविषयीही सहानभुती व्यक्त केली आहे. अन्य औपचारीकता आटोपल्यानंतर या विमानाला पुढील प्रवासासाठी अनुमती दिली गेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.