गोव्यात इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लॅंडिग

इंजिनला आग लागल्याने करावे लागले लॅंडिंग

पणजी: गोव्याहून रविवारी रात्री दिल्लीला निघालेले इंडिगोचे विमान इंजिनाला आग लागल्यामुळे त्याचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. गोवा विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर विमानाला पुन्हा गोव्याकडे वळवण्यात आले. या विमानात एकूण 180 प्रवासी होते. यामध्ये गोव्याचे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांच्यासह काही अधिकाऱ्यांचाही समावेश होता. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

काल रात्री विमानाने उड्डाण केल्यावर सुमारे 20 मिनिटांनी डाव्या बाजूला इंजिनामधून धूर बाहेर येऊ लागला. विमानातील प्रवाशांना इंजिनात आग लागल्याचे दिसत होते. त्यामुळे सगळेच घाबरले होते. पण लगेचच वैमानिकाने ते इंजिन बंद केले आणि एका इंजिनावर विमान मागे वळवण्याचा निर्णय घेतला. वैमानिकाने अत्यंत संयतपणे परिस्थिती हाताळल्याचे नीलेश काब्राल यांनी म्हटले आहे. यानंतर लगेचच हे विमान परत पणजी विमानतळावर आणण्यात आले. आणि दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दिल्लीकडे रवाना करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.