‘या’ राज्यातील भाजप सरकार मध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत; अचानक बोलावली बैठक

डेहराडून – उत्तराखंड भाजपच्या कोअर कमिटीची अचानक बैठक बोलावण्यात आली होती. त्यामुळे या राज्यातील भाजप सरकारमध्ये मोठे फेरबदल केले जाण्याची शक्‍यता सुचित करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल अचानक ही बैठक घेण्यात आली. त्यांच्या समवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दुष्यंतकुमार हेही या बैठकीला उपस्थित होते.

सध्या उत्तराखंड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्या काळातच ही बैठक झाल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात खांदेपालट होईल असे सांगण्यात येते. या बैठकीसाठी मुख्यमंत्री त्रिदेवसिंह रावत यांनाहीं तातडीने येथे बोलावून घेण्यात आले.

भाजपच्या या कोअर ग्रुप मध्ये खासदार नरेश बंन्सल, खासदार माला राजलक्ष्मी शहा, माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा, खासदार अजय भट्ट, कॅबिनेट मंत्री मदन कौशिक, धनसिंह रावत अदिंचा समावेश आहे. पक्षाचे निरीक्षक रमणसिंह यांनी कोअर कमिटीतील प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर त्यांनी तेथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयालाही भेट दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.