मनसेचे महाधिवेशन दोन दिवसांवर आले आहे, त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून बॅनरबाजी केली जात आहे. मनसेचे बॅनर कसे असावे याबाबतचे पोस्टर मनसे मध्यवर्ती कार्यालयाने नुकतेच प्रकाशित केले होते. त्यानुसारच पदाधिकाऱ्यांनी नवीन बॅनर तयार केले आहेत.
#मनसे_अधिवेशन #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray #MaharashtraDharma #HindaviSwarajya pic.twitter.com/6VzHDgY5hM
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 21, 2020
ज्या बॅनरवरुन मनसेचा पूर्वीचा झेंडा गायब आहे. नव्या झेंड्याचे स्वरुप कसे असणार हे जरी अजून स्पष्ट नसले तरी नव्या झेंड्याचा रंग हा भगवा असणार आहे. यावरून राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भुमिका अजून ठळक होत नव्हती मात्र मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या या चर्चेला समर्थन दर्शवणारे संकेत देणारे ट्विट मनसेच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मनसेच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक १६ सेकंदांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आकृती दिसत आहे. तसेच या ट्विटमध्ये ‘हिंदवी स्वराज्य’ हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. या व्हिडिओला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा व्हाइस ओव्हर आहे. राज यांच्या भाषणातील “महाराजांच्या आजपर्यंतच्या सगळ्या लढाया आपण पाहिल्या तर प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक जातीचा माणूस हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता” ही ओळही व्हिडिओत ऐकू येते.