#Football : भारताच्या विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेऱ्या रद्द

क्वालालंम्पूर – भारताच्या फुटबॉल विश्‍वकरंडक 2022 आणि आशिया करंडक 2023 स्पर्धेसाठी मार्चमध्ये होणाऱ्या भारताच्या पात्रता फेरीच्या लढती रद्द करण्यात आल्या आहेत. करोनामुळे प्रवास व विलगीकरणाच्या मर्यादा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्या असून, आता या फेरीच्या स्पर्धा जून मध्ये होतील.

या दोन्ही स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने नोव्हेंबर 2019 पासून झालेले नाहीत. करोनामुळेच हे सामने लाबंणीवर पडत आहेत. मार्चमध्ये हे सामने होणार होते, मात्र पुन्हा एकदा करोनाचे संकट आले आहे. हे सामने आता जूनमध्ये होणार असले, तरी त्याच्या तारखा निश्‍चित करण्यात आलेल्या नाहीत.
आशियात कायम असलेले करोनाचे संकट आणि त्यामुळे प्रवासावर आलेल्या मर्यादा आणि विलगीकरणाच्या अडचणी यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे आशियाई फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाला फिफाने देखील मान्यता दिली आहे.

पुढील कार्यक्रमाची माहिती देताना आशियाई फुटबॉल महासंघाने आशियाई स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीत या 15 जूनपूर्वी पूर्ण केल्या जातील. त्याचबरोबर फिफाच्या आशियातील पात्रता फेरीत या सप्टेंबर 21 मध्ये सुरू होतील.

फिफाच्या 2021 मधील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळापत्रकानूसार पहिला टप्पा 22 ते 30 मार्च तर, दुसऱा टप्पा 31 मे ते 15 जून पर्यंत होणार आहे. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेतून भारतीय संघ बाहेर पडला असला, तरी आशियाई स्पर्धेसाठी भारताला अजूनही संधी आहे. चीनमध्ये होणाऱ्या या आशियाई स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताला अजून कतार, बांगलादेश आणि अफगाणिस्तान असे तीन सामने खेळायचे आहेत. यातील कतार आणि अफगाणिस्तानचे सामने मायदेशात, तर बांगलादेशाचा सामना बाहेर होणार आहे.

भारताचा ई गटात समावेश असून, 5 सामन्यातून त्यांचे गुण झाले आहेत. गटात कतार 13 गुणांसह आघाडीवर आहे. ओमान दुसऱ्या स्थानावर आहे. यातील आठ गट विजेते आणि सर्वोतम चार उपविजेते संघ विश्‍वरंडक स्पर्धेच्या अंतिम पात्रता फेरीत खेळतील.

भारताला तिसरे स्थान मिळाले, तर त्यांना आशिया करंडकाच्या तिसऱ्या पात्रता फेरीत थेट प्रवेश मिळेल. भारताचा कतारविरुद्धचा सामना गेल्या वर्षी 8 ऑक्‍टोबरला होणार होता. मात्र, करोनामुळे तो रद्द करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.