Tokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव

नवी दिल्ली – ऑलिम्पिक स्पर्धेत रजतपदक मिळवलेल्या भारताच्या वेटलिफ्टर मीराबाई चानूवर सध्या बक्षिसांचा वर्षाव होत आहे. मीराबाई भारतीय रेल्वेत सेवेत आहे. ती सोमवारी भारतात परतली तेव्हा तिचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.

त्यानंतर रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्ण यांनी मीराबाईसह तिच्या प्रशिक्षकांचाही गौरव केला. मीराबाईला दोन कोटी रुपयांचे बक्षीसही घोषित केले.

तसेच मीराबाईला सेवेत पदोन्नती देण्याचेही जाहीर केले. मीराबाईला क्रीडा कोट्यातून रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.