मुंबई – यंदाच्या मोसमात भारतीय क्रिकेट संघ सातत्याने सामने खेळणार आहे. इंग्लंडवरून थेट अमिरातीला आयपीएल खेळण्यासाठी खेळाडू रवाना झाले असून त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा पार पडल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने 17 डिसेंबरपासून होणार आहे.
सध्या जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघ सर्वात जास्त व्यस्त असून या कसोटी मालिकेसह संघ एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. हा दौरा डिसेंबर व जानेवारीमध्ये या कालावधीत होत आहे.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकूण दहा सामने खेळायचे आहेत. यात तीन कसोटी सामन्यांचा समावेश असून ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग आहे. दोन्ही देशांमधील अखेरची मालिका गेल्या वर्षी मार्चमध्ये झाली होती.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
पहिली कसोटी – 17 ते 21 डिसेंबर
दुसरी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर
तिसरी कसोटी – 3 ते 7 जानेवारी
पहिला एकदिवसीय सामना – 11 जानेवारी
दुसरा एकदिवसीय सामना – 14 जानेवारी
तिसरा एकदिवसीय सामना – 16 जानेवारी
पहिला टी -20 सामना – 19 जानेवारी
दुसरा टी-20 सामना – 21 जानेवारी
तिसरा टी-20 सामना – 23 जानेवारी
चौथा टी-20 सामना – 26 जानेवारी.