पुणे – अमेरिकेतील हॉल ऑफ फेम येथे आयोजित करण्यात आलेल्या 40 व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत इशिनरियु कराटे अँड कोबुडो असोसिएशन ऑफ इंडियाच्या खेळाडूंनी 29 सुवर्णपदकांची कमाई केली.
या स्पर्धेत इशिनरियु कराटे अँड कोबुडो असोसिएशनचे 21 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये सलील नाडकर्णी, शर्मिला नाडकर्णी, अतुल्य नाडकर्णी, मेहेक भाटिया, वेदांत काळे, आर्य मलानी, शंतनु गाडवे, परम रावण, समृद्धी गाडवे, सुखदा भिडे, मल्हार बापट, मृणेंद्र बेल्हे, ऋषभ शहा, निरंजन देव, रोमित मोटे, प्रणव बारणे, मोहित बारणे, वरद कंटक, सूर्यांश गाडवे, अथर्व देशपांडे, नीरजा देव यांनी अव्वल कामगिरी केली. याच संघाचा खेळाडू अनिकेत शिरोळेने लंडनला झालेल्या जागतिक कराटे स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्यपदकांची कमाई केली. त्याला या कामगिरीबाबत विशेष चषकही देण्यात आला.