कतार – भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बात्रा व सुतिर्था मुखर्जीने येथे सुरू असलेल्या जागतिक एकेरी पात्रता टेबल टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या बाद फेरीत विजयी सलामी दिली. या विजयासह त्यांनी टोकियो ऑल्मपिकच्या पात्रतेची दावेदारी आणखी भक्कम केली.
मनिकाने बल्गेरियाच्या मारिया योवकोवावर 11-5, 11-7, 11-4, 11-0 ने मात केली. सुर्तिथाने इटलीच्या लिसा लुंगचा 11-3, 11-5, 11-7, 12-10 पराभव केला. भारताचा अव्वल मानांकित खेळाडू अचंता शरत कमल आणि जी साथियानला मात्र, पुरुषांच्या एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
साथियानला मिहाई बोबोसिकाने 11-7, 11-6, 11-8, 11-5 असे पराभूत केले तर, शरतला निएगोल स्तोयानोवकडून 11-9, 6-11, 8-11, 4-11, 11-8, 10-12 असा पराभव स्वीकारावा लागला.