बर्मिंगहॅम – बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूनी चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने सुवर्णपदक पटकावले. तिच्यापाठोपाठ भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने बॅडमिंटन पुरुष एकेरीत सुवर्णपदक पटकावले. हे त्याचे या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलेच सुवर्णपदक ठरले.
LAKSHYA’S GOLDEN TRIUMPH!!
Shuttler @lakshya_sen wins gold after defeating Malaysia’s Tze Yong (2-1) in the Badminton Men’s Singles event at the #CommonwealthGames2022.
A compelling match throughout!
Congratulations, Lakshya!! #CWG22 | #CWG2022India @Media_SAI pic.twitter.com/1HIVG5lINv— Dept of Sports MYAS (@IndiaSports) August 8, 2022
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सेनने मलेशियाच्या ची यॉंग एनजी याच्यावर 21-19, 9-21, 16-21 अशी सरळ तीन गेममध्ये मात केली व सुवर्णपदकावर नाव कोरले. एनजी याच्याविरुद्ध पहिल्या गेममध्ये सेन पिछाडीवर पडला होता. मात्र, त्याने नंतर अफलातून पलटवार केला.
या गेममध्ये या दोघांत 18-18 अशी बरोबरीही झाली होती. मात्र, एनजीने ही गेम 21-19 अशी खिशात टाकली. यानंतर दुसऱ्या गेममध्ये मात्र सेन आक्रमक झाला व त्याने जोरदार व्हॉली केल्या. एनजीला त्याच्या खेळाला उत्तर देणे फारसे जमत नव्हते. त्याने याच दबावाखाली या गोममध्ये 21-9 असा विजय मिळवला व बरोबरी केली.
तिसऱ्या गेममध्ये सेन व एनजी यांच्यात चांगली लढत पाहायला मिळाली. सातत्याने एकेक गुणाची रस्सीखेच होत होती. कोणताही खेळाडू कमी पडताना दिसला नाही. मात्र, अखेर सेनचा अनुभव मोठा ठरला. ही गेम सेनने 21-16 अशी जिंकत सामना व सुवर्णपदकही पटकावले.