संयुक्तराष्ट्रे – संयुक्त राष्ट्रांच्या तीन संस्थांवर भारताची निवड करण्यात आली आहे. क्राईम प्रिव्हेन्शन अँड क्रिमिनल जस्टीस या विभागावर भारताची निवड झाली असून 1 जानेवारी 2022 पासून तीन वर्षांसाठी ही निवड आहे.
त्याखेरीज महिला समानता व महिला सक्षमीकरणविषयक समितीवरही भारत निवडला गेला आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रॅमच्या कार्यकारी मंडळावरही भारताला तीन वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. संयुक्तराष्ट्रांच्या विविध संस्थावर विविध देशांच्या प्रतिनिधींची ठराविक कालावधी नंतर नियुक्ती केली जात असते.
वर्ल्ड फूड प्रोग्रॅम या महत्त्वाच्या समितीवर भारताखेरीज फ्रान्स, घाना, कोरिया, रशिया आणि स्वीडन या देशांचीही निवड झाली आहे. या समित्यांवरील काही नियुक्त्या नेमणूक पद्धतीने तर काही नियुक्त्या गुप्त मतदान पद्धतीने केल्या जात असतात.