संयुक्‍त राष्ट्राच्या महिला दर्जा आयोगावर भारताची वर्णी

चीनला पराभूत करून मिळवले सदस्यत्व

संयुक्त राष्ट्र – संयुक्‍त राष्ट्राच्या महिला आयोगावर आज भारताची वर्णी लागली. लैंगिक समानतेसाठी आणि महिला सबलीकरणासाठी महत्वाच्या या जागतिक मंचावर वर्णी लागण्यासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत भारतीय प्रतिनिधींनी चीनचा पराभव केला. म्हणून ही निवडणूक भारतासाठी विशेष महत्वाची होती. महिलांचा दर्जा आयोग हा संयुक्‍त राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक परिषदेचा (इकॉसॉक)सक्रिय आयोग आहे.

“इकॉसॉक’ या 54 सदस्यांच्या मंचाचे 2021 च्या सत्राची पहिली बैठक सोमवारी झली. या बैठकीमध्ये अशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांच्या वर्गवारीमध्ये दोन सदस्यांची निवडणूक होणार होती. या दोन पदांसठी अफगाणिस्तान, भारत आणि चीनच्या सदस्यांची उमेदवारी होती.

निवडणूकीत झालेल्या 54 मतांपैकी संयुक्‍त राष्ट्रातील राजदूत अदेला राज यांच्या नेतृत्वाखालील्‌ अफगाणिस्तानला 39 मते मिळाली. तर भारताला 38 मते मिळाली. तर तिसरा उमेदवार असलेल्या संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील प्रमुख सदस्य असलेल्या चीनला केवळ 27 मते मिळली. एकूण मतांपैकी निम्मी मते मिळवणेही चीनला शक्‍य झाले नाही. बहुमतासाठी आवश्‍यक असलेला 28 मतांचा टप्पाही गाठणे चीनला शक्‍य झाले नाही.

भारताला या मंचावर निवडून दिल्याबद्दल सदस्य देशांचे आभार आणि सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी भारताचा विचार व्हावा, असे भारताच्या राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.