केपटाउन – दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा एका अनोख्या गोष्टीने गाजत आहे. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि हा एक विक्रम ठरला.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने ही कसोटी निर्णायक ठरणार आहे. तिसऱ्या कसोटीत कोहलीने नाणेफेक जिंकली आणि त्याच बरोबर एक नवा विक्रमदेखील केला.
भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 10 व्यांदा नाणेफेक जिंकली आहे. याच बरोबर भारताने 8 वर्षांपूर्वीच्या आपल्याच कामगिरीची बरोबरी केली. याद्वारे भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा सलग 10 वेळा नाणेफेक जिंकली आहे.
यापूर्वी 18 डिसेंबर 2013 ते 26 फेब्रुवारी 2014 या कालावधीत भारतीय संघाने सलग 10 वेळा नाणेफेक जिंकली होती. भारताने 3 नोव्हेंबर 2021 साली झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नणेफेक गमावली होती.
आठ वर्षांपूर्वी भारताने 18 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे कसोटीत नाणेफेक जिंकली होती. त्यानंतर 26 फ्रेब्रुवारी 2014 साली बांगलादेशविरुद्ध 10 व्यांदा नाणेफेक जिंकली होती.