भारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का? :  सॅम पित्रोदा

नवी दिल्ली – पुलवामा दहशस्तवाडी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानात एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मदाचे तळ उद्ध्वस्त केले. परंतु, गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी एअर  स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुलवामा हल्ल्यासाठी संपूर्ण पाकिस्तानला दोषी धरणे चुकीचे आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असे मत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे.

सॅम पित्रोदा म्हणाले कि, भारताच्या एअर स्ट्राईकबद्दल मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले. त्यानुसार, भारताने खरच हल्ला केला का? खरच ३०० दहशतवादी मारले? जर तुम्ही म्हणता की ३०० दहशतवादी मारले, तर सर्व भारतीयांना याचा पुरावा मिळायला हवा. कारण, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही असे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे. याचे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असेही त्यांनी सांगितले.

काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही. भारतावर अशा प्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. मुंबईतही असाच हल्ला झाला होता, तेव्हाही आपण विमाने पाठवू शकत होतो. पण मला ही भूमिका पटत नाही, असे पित्रोदा यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.