सर्वोत्तम कामगिरीत भारताचा राहुलच हिट

नवी दिल्ली –आयसीसीने दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय संघचा कर्णधार विराट कोहलीला दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, यंदाच्या मोसमात टी-20, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये लोकेश राहुल जगातील टॉप 5 सर्वोत्तम फलंदाजांमध्ये भारताकडून हिट ठरला आहे. 

या टॉप 5 फलंदाजांमध्ये 4 खेळाडू ऑस्ट्रेलियाचेच आहेत. ऍरन फिंच, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लेबुशेन व डेव्हिड वॉर्नर यांचा टॉप 5 मध्ये समावेश आहे. या यादीत राहुल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फिंच हा या वर्षात एकदिवसीय सामन्यांमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. फिंचने 13 सामन्यात 56.08 च्या सरासरीने 2 शतक व 5 अर्धशतकांसह एकूण 673 धावा केल्या.

 

रनमशीन अपयशी… 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसीने दशकातील सर्वश्रेष्ठ पुरस्काराने गौरवले. मात्र, त्याला या वर्षात क्रिकेटच्या एकाही प्रकारात टॉप 5 मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. तो एकदिवसीय सामन्यांत 6 व्या, टी-20 मध्ये 7 व्या क्रमांकावर आहे. कसोटीत तर त्याचे पहिल्या 10 फलंदाजातही नाव नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.