नवी दिल्ली – केंद्रीय सांख्यिकी विभागाने परवा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील दरडोई उत्पन्नात 10 टक्के वाढ होऊन ते 10,534 रुपये प्रति महिना झाले आहे.
गेल्या वर्षी भारतातील दरडोई उत्पन्न 9,580 रुपये प्रति महिना होते. जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतातील दरडोई उत्पन्न वर्षाला 1 लाख 26 हजार 406 रुपये तर महिन्याला 10,534 रुपये आहे. आगामी काळात विकासदर वाढल्यानंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.