लसीकरणात भारताचा नवा उच्चांक; WHO ने केले अभिनंदन

नवी दिल्ली – कोरोनावर प्रभावी ठरणारी मात्रा भारतात तयार करण्यात आली. एवढच नाही तर ती जगभर पोहचविण्यात सुद्धा आली. देशातील कानाकोपऱ्यापर्यंत लसीकरण करण्यात आले.

वैद्यकीय नियमानुसार अठरा वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला किमान दोन डोस घेणे बंधनकारक असल्याने देशात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची दखल घेत जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच (WHO) ने भारत देशाचे अभिंनदन केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, “या वर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू झाल्यापासून भारतात 75 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत.

जर याच वेगात लसीकरण सुरु राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील 43 टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होईल. तसेच करोना साथीची तिसरी लाट रोखण्यासाठी भारताला वर्षाच्या अखेरीस 60 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस द्यायचे आहेत.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरु आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाने 75 कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे.” असे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले,

 

WHO कडून भारताचे अभिनंदन
डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितले की, “डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने कोरोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. पहिले 100 दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला 85 दिवस लागले. दरम्यान, भारताने केवळ 13 दिवसांत 650 दशलक्ष कोरोना डोसपासून 750 दशलक्ष करोना डोस देण्याचा टप्पा पुर्ण केला आहे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.