नवी दिल्ली – लांब उडी क्रीडा प्रकारातील भारताचा उदयोन्मुख खेळाडू मुरली श्रीशंकर याने ग्रीसमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय जंपींग स्पर्धेत 8.31 मीटर अंतराची नोंद करत सुवर्णपदक पटकावले आहे.
जपानमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने 8.36 मीटर लांब उडी मारत राष्ट्रीय विक्रम साकार केला होता. या स्पर्धेत मात्र आपल्याच विक्रमाला मागे टाकत नवा उच्चांक प्रस्थापित केला.
या गटात स्वीडनच्या टोबियास मॉंटलेरने 8.27 मीटर अंतर पार करत रजतपदक मिळवले तर, फ्रान्सच्या जुलेस पोमेरी याने ब्रॉंझपदक मिळवले. मुरलीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7.69 मीटर अंतर नोंदवताना 24 व्या क्रमांकावर समाधान मानले होते.