ओसाका – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर जी-20 परिषदेसाठी गेले असून या ठिकाणी त्यांनी सौदीचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे हज यात्रेसाठीचा कोटा वाढवून देण्यात यावा अशीविनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देत सौदीने हज यात्रेसाठीचा कोटा 30 हजारांनी वाढवला आहे.
त्यामुळे आता भारतातील हज यात्रेकरुंसाठी खुशखबर मिळाली आहे. सौदी अरेबियाकडून हज यात्रा कोट्यात तीस हजारांनी वाढकेल्याने एका वर्षात 2 लाख मुस्लीम बांधवांना हज यात्रा करता येणार आहे. आतापर्यंत एक लाख सत्तर हजार मुस्लिम बांधवांना हज यात्रा करता येत होती. मक्का येथे दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लिम बांधव हज यात्रा करण्यासाठी येतात. जी-20 बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद बिन सलमान यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.