नवी दिल्ली- भारतीय रेल्वेची बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था म्हणून काम करणाऱ्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे आयआरएफसीने गेल्या आठवड्यात आयपीओ गुंतवणूकदारांना उपलब्ध केला होता. आज शेअर बाजारावर या शेअरची नोंदणी झाली त्यावेळी शेअर्सच्या किमतीत चार टक्क्यांची घट झाली असल्याचे दिसून आले.
आता कंपनीचे बाजार मूल्य 32,475 कोटी रुपये इतके भरले आहे. एकूण उपलब्ध शेअरच्या साडे तीनपटीने या शेअरला मागणी आली होत. आज शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर बरीच विक्री झाल्यामुळे या शेअरच्या किमती कमी झाल्या.
पुढील आठवड्यात ब्रूकफील्डचा आयपीओ
मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील बुकफील्ड कंपनीने आपल्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा(आरईआयटी) आयपीओ जाहीर केला असून यातील शेअरच्या किमती 274 ते 275 रुपये ठरविण्यात आल्या आहेत. गुंतवणूकदारांना 200 शेअरचा लॉट खरेदी करता येणार आहे. 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान या शेअरसाठी नोंदणी करता येणार आहे या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 8,327 कोटी रुपये उभारणार आहे.