First Hydrogen Ship Reached Kashi | भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज वाराणसीला पोहोचले आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा हे जहाज कोलकता येथून जलमार्गाने वाराणसीच्या हद्दीत दाखल झाले. हे जहाज कुंभमेळ्यादरम्यान काशी ते प्रयागराज चालवण्याची योजना आहे.
हे जहाज काशीच्या 84 घाटांच्या साखळीच्या शेवटी नव्याने बांधलेल्या नमो घाटावर पार्क केले जाईल आणि नंतर वाराणसी-हल्दिया जल महामार्ग-वनच्या पहिल्या मल्टी मॉडेल बनारस टर्मिनल (रामनगर) येथे नेले जाईल. येथे जहाजाच्या आतील बाजूची सजावट, प्रकाशयोजना आदी कामे केली जाणार आहेत. त्यानंतर भाविकांचा काशी विश्वनाथ धामचा प्रवास सुरळीत करण्यासाठी ते चालवले जाईल.
हे जहाज चालवण्याची जबाबदारी पर्यटन विभागाकडे सोपवण्यात येणार आहे. त्याचा मार्ग आणि भाडे पर्यटन विभाग ठरवेल. सर्व काही सुरळीत झाल्यास स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून याची सेवा सुरू होऊ शकते. First Hydrogen Ship Reached Kashi |
काय आहे या जहाजाची खासियत?
- भारतीय जलमार्ग प्राधिकरणाने (IWAI) प्रदूषणमुक्त पर्यटनाला चालना देण्यासाठी वाराणसी येथून हायड्रोजन जहाज सुरू करण्याची तयारी केली. कोची शिपयार्ड येथे तयार करण्यात आलेले हे जहाज पूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणार आहे.
- साधारण १० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे जहाज पूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालते. या जहाजामध्ये एक इलेक्ट्रिक इंजिन देखील बसविण्यात आले आहे, ज्यामुळे हायड्रोजन इंधन संपल्यास ते इलेक्ट्रिक इंजिनने देखील चालवता येऊ शकते.
- २० टन वजनाची ही क्रूझ कोचीच्या शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. या जहाजात ५० प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. हे जहाज २८ मीटर लांब आणि ५.८ मीटर रुंद आहे. तसेच ही जहाज अनेक सुविधांनी सुसज्ज अशी आहे.
- ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या या क्रुझमुळे वायुप्रदूषण, ध्वनी प्रदूषण होण्याचा धोका नाही. त्याचबरोबर या हायड्रोजन क्रूझच्या ऑपरेशनमुळे गंगा नदीलाही कोणतीही हानी होणार नाही. First Hydrogen Ship Reached Kashi |
हेही वाचा: