मुंबई: भारताच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे सोमवारी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले असून निधन समयी त्या 72 वर्षांच्या होत्या.
चौधरी या 1972 च्या आयपीएस बॅचच्या विद्यार्थी होत्या. त्याच बरोबर त्या भारतातील पहिल्या महिला पोलिस महासंचालक होत्या. तर, किरण बेदी यांच्या नंतर त्या दुसऱ्या पोलिस अधिकारी होत्या अशी माहिती आयपीएस असोसिएशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देताना चौधरीयांना श्रद्धांजली वाहिली आहे.